Maharashtra Political Crisis | उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अडचणीत वाढ, मविआच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात फूट पडली आहे. यानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray group) नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session) पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची भेट घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करु शकत नाही, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी शिष्टमंडळाने (Maharashtra Political Crisis) राज्यपालांकडे केली आहे.

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने (Delegation) राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट नेते जयंत पाटील (Leader Jayant Patil), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut), अॅड. अनिल परब (Adv. Anil Parab), शिवसेना नेते सुनील प्रभू (Sunil Prabhu), माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure), आमदार अरूण लाड (MLA Arun Lad) आणि आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी
मविआचे नेते आक्रमक झाले होते. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळाने आज (सोमवार) राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये 40 आमदारांचा समावेश होता. नीलम गोऱ्हे यांना पदावरुन हटवण्याची मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

अंबादास दानवे म्हणाले, विधान परिषदेचे उपसभापती यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या पदावर राहून योग्य न्याय देऊ शकत नाहीत.
त्यामुळे राज्यपालांना आता या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही यावेळी केल्याचे दानवे यांनी सांगितले.

Web Title :   Maharashtra Political Crisis | demand for removal of neelam gorha from the post of deputy chairman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Monsoon Session | ‘आधी होते खोके सरकार, आता आले बोके सरकार’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी (व्हिडिओ)

Sanjay Dutt And Arshad Warsi | मुन्ना भाई व सर्किटची सुपरहिट जोडी पुन्हा झळकणार पडद्यावर? फोटोवरुन चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis | अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, दादांनी आज पुन्हा थोरल्या पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Maharashtra Monsoon Session | ठाकरे गटाचा नीलम गोऱ्हेंच्या पदावर आक्षेप, कायद्याचा उल्लेख करत अनिल परब म्हणाले… (व्हिडिओ)