Maharashtra Political Crisis | ‘रोखठोक’वरुन मनसेची सडेतोड टीका ! ‘संजय राऊत स्वातंत्र्य सेनानी नाहीत, भ्रष्टाचारप्रकरणी अटक झालीय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) ईडीच्या (ED) कोठडीत असूनही दर रविवारी सामनातून प्रसिद्ध होणारे त्यांचे रोखठोक हे सदर आजही प्रसिद्ध झाल्याने मनसेने ‘ईडी’ च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीला कारागृहातून लेख लिहिण्याची परवानगी आहे का ? इत्यादी प्रश्न मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत उपस्थित केले आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीला कारागृहातून लेख लिहिण्याची परवानगी आहे का ? कारण ते काही स्वातंत्र सैनिक नाहीत किंवा त्यांच्या नावाने दुसरे कोणी लेख लिहित आहेत का ? कोणी डुप्लीकेट संजय राऊत तयार झाले आहेत का ? असे प्रश्न सामान्य जनतेला पडत आहेत. ते प्रश्न आम्ही उपस्थित केले आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

आजच्या सामनात रोखठोक या सदरात संजय राऊत यांच्या नावाने लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनाही माफी मागावी लागली होती.

 

लेखात पुढे म्हटले आहे की, नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे.

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | mns leader sandeep deshpande criticizes shivsena sanjay raut over rokhthok article

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा