Maharashtra Political Crisis | ‘नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे 4 तास, पण…’ – एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्र्यांकडे नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी 4 तास, पण शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली आहे. सतत आमदार-खासदार फोडाफोडी, शिवसेनेला धक्के देणे आणि मविआ सरकारने (MVA Government) घेतलेले निर्णय रद्द करणे अशीच कामे शिंदे सरकारची सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका होत आहे. (Maharashtra Political Crisis)

 

एकनाथ खडसे यांनी यांनी म्हटले की, राज्यात पूरस्थितीने मोठे नुकसान झाले आहे, मात्र नुकसान भरपाईचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पालकमंत्री नसल्याने लोकांचे अश्रू पुसायला कोणी नाही. मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण पूरग्रस्त शेतकर्‍यांना भेटायला त्यांना वेळ नाही. राज्य सरकारची आता आयसीयू पेशंटसारखी स्थिती आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे. सध्या दोघांचे सरकार चालू आहे. (Maharashtra Political Crisis)

 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला (MSRTC Bus) मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघाताबाबत एकनाथ खडसे म्हणाले, ही दुर्घटना अतिशय दु:खद आहे. या अपघाताविषयी अधिकार्‍यांशी बोललो, माहिती घेतली. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी माझी सरकारला विनंती आहे. असे अपघात टाळण्यासाठी उपाय योजना केल्या पाहिजेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.
शिवसेनेचे राज्यातील 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात जाऊ शकतात.
यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज बंडखोर खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात.
शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी वेगळा गट तयार केल्यास शिवसेनला पुन्हा एकदा न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आपले 18 खासदार असल्याचा दावा केला आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | ncp eknath khadse criticised cm eknath shinde govt over flood situation in the maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)