Maharashtra Political Crisis | ‘काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, कायम उद्धव ठाकरेंसोबतच’ – वर्षा संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | आम्ही कायम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहोत. काहीही झाले तरी आम्ही शिवसेना (Shivsena) सोडणार नाही, असा निर्धार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनी व्यक्त केला. ईडीने (ED) तब्बल 8 ते 10 तास चौकशी केल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) संजय राऊत यांची ईडी कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. (Maharashtra Political Crisis)

 

सुमारे 8 ते 10 तास चाललेल्या चौकशी दरम्यान ईडीने वर्षा राऊत यांचा सविस्तर जबाब नोंदवल्याचे समजते.
यानंतर वर्षा राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मला पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.
मात्र, ईडीने पुन्हा चौकशीला बोलावले तरी मी चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन.

 

वर्षा राऊत म्हणाल्या, काहीही झाले तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही.
आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. यावेळी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) म्हणाले,
माझ्या वहिनी वर्षा राऊत यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
ईडीने त्यांचा जबाब घेऊन बाहेर सोडले आहे. जबाबानंतर वहिनींशी बोललो.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (ShivSena chief Balasaheb Thackeray) जागेवर उद्धव ठाकरे आहेत.
आम्ही उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या स्थानी मानतो.
त्यामुळे आम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही. (Maharashtra Political Crisis)

 

पत्राचाळ प्रकरणातील पैसा निकटवर्तीयांच्या खात्यात वळवणे,
या पैशातून दादरमधील फ्लॅटची खरेदी, अलिबागमध्ये जमिन खरेदी केल्या तसेच प्रवीण राऊतांकडून (Praveen Raut) मिळालेला पैसा कसा आणि कुठे वापरला याचा शोध ईडी घेत आहे.
वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या कंपनीत अवघे काही हजार रुपयांची गुंतवणूक करून वर्षभरात लाखो लाखोंची कमाई केल्याचा ईडीचा आरोप आहे.
दरम्यान, प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांनी ईडीला दिलेल्या जबाबामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढू शकतात, असे म्हटले जात आहे.

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | sanjay raut wife varsha raut said our full support to shivsena chief uddhav thackeray and we will not left party

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा