Maharashtra Political Crisis | शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे, सुनावणी पुन्हा लांबणीवर!

नवी दिल्ली : Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Party And Sign Conflict) संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील (Suprme Court) सुनावणी लांबणीवर गेली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे. आता पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला होईल. त्यामुळे यासंबंधीचा निकाल दिवाळीनंतरच (Hearing After Diwali) लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political Crisis)

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल एकतर्फी असून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फिरवावा, अशी मागणी ठाकरे गटाने (Thackeray Group) याचिकेत केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला (Shinde Group) दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात धाव घेतली होती. (Maharashtra Political Crisis)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती.
पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होणार होती.
मात्र ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी १३ दिवसांनी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ED Action On Ishwarlal Jain- RL Jewellers | शरद पवारांच्या खच्चीकरणासाठी केंद्रीय यंत्रणांची छापेमारी? निकटवर्तीय 7 उद्योगपतींवर ईडीची कारवाई

Ashish Shelar On Uddhav Thackeray | आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भविष्यात म्हणतील गर्वसे कहो हम एमआयएम हैं’