ED Action On Ishwarlal Jain- RL Jewellers | शरद पवारांच्या खच्चीकरणासाठी केंद्रीय यंत्रणांची छापेमारी? निकटवर्तीय 7 उद्योगपतींवर ईडीची कारवाई

मुंबई : ED Action On Ishwarlal Jain- RL Jewellers | जसजशा निवडणूका जवळ येत आहेत, तसतसा राजकीय डावपेचांना सुद्धा वेग आला आहे. इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वा शरद पवार यांच्या ६ निकटवर्तीय उद्योगपतींवर ईडीने यापूर्वी छापेमारी केली आहे. आता राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची तब्बल ३१५. ६ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. (ED Action On Ishwarlal Jain- RL Jewellers)

ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादीचे पंधरा वर्षे खजिनदार होते. ते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुख आहेत. तसेच राज्यसभा सदस्य आहेत. ईडीने जैन यांच्यासह त्यांचा मुलगा मनीष जैन यांच्यावर काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. छापेमारीची ही कारवाई प्रामुख्याने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ येथे करण्यात आली होती. (ED Action On Ishwarlal Jain- RL Jewellers)

आता ईश्वरलाल जैन यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी ईडीने त्यांची तब्बल ३१५ कोटींची चल आणि आचल संपत्ती जप्त केली आहे.

या प्रकरणाची माहिती देण्यासाठी ईडीने एक पत्रक काढले आहे. यात म्हटले आहे की, शनिवारी पीएमएलए कायद्यानुसार राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ या ठिकाणी असलेल्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. यामध्ये पवन चक्की, चांदी, हिरे, सोने आणि भारतीय मुद्रा अशी संपत्ती जप्त केली आहे.

ईडीने म्हटले आहे की, संबंधितांवर कारवाई करताना त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल केला आहे. जैन यांनी बँकेत गहाण ठेवून जे पैसे घेतले होते ते पैसे इतर कामाला वापरले शिवाय बँकेत गहाण ठेवलेल्या जमिनींची देखील परस्पर विल्हेवाट लावली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली आहे.

शरद पवार भाजपाविरोधात आक्रमक झाल्यानेच त्यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय यंत्रणांद्वारे कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणूका पाहता, येत्या काळात विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यासाठी ही पद्धत आणखी राबवली जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांचे निकटर्तीय असलेल्या ६ जणांवर यापूर्वी केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वाधवान बिल्डर (एचडीआयएल प्रकरण) मार्केटींग कंपनीची ८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्टड्ढक्चर लिमिटेडचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्या कार्यालयावर छापेमारी करून अटक करण्यात आली होती.

दिवाण बिल्डर (डीएचएफएल प्रकरण) प्रकरणात सतरा विविध बँकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. यामध्ये अविनाश भोसले आणि वादवान बंधू यांच्या कंपन्यांना पैसा दिल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले आणि वादवान हे दोघेही शरद पवारांचे निकटवर्ती आहेत.

एमनोरा टाऊनशिपचे मालक आणि सिटी बँकेचे चेअरमन अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर ईडीनी धाड टाकली.
आर्थिक गैर व्यवहारातून या धाडी पडल्याची माहिती आहे.

डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयने कारवाई केली होती. भोसले यांचे एक
हेलिकॉप्टर देखील ताब्यात घेतले.

जेट एअरवेज ५३८ कोटी रुपयांच्या कथीत बँक फसवणुकप्रकरणी ईडीने कारवाई करून नरेश गोयल आणि त्यांच्या
पत्नी विरोधात मनी लॉन्ड्रीग केस दाखल केली.

येस बँकेचे अध्यक्ष असताना राणा कपूर यांनी डीएचएफएल, एचडीआयएल अबिल यासारख्या कंपन्यांना मोठ्या रकमेचे
कर्ज दिले आणि त्या बदल्यात लाच घेतली. येस बँकेने तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि त्यापैकी
वीस हजार कोटी रुपये बुडीत कर्जात बदलले. यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhidewada Smarak Issue Solved | ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न निकाली! सुप्रीम कोर्टातील खटला
पुणे महापालिकेने जिंकला

Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा; भूसंपादनाशी निगडीत दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने

Meera Borwankar Explation On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी लिलाव केला नाही, हे सत्य, पण…’, मीरा बोरवणकर यांनी दिले स्पष्टीकरण

Gopichand Padalkar On Sharad Pawar | गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पुन्हा शरद पवारांना डिवचले, म्हणाले…

Chiplun Flyover Bridge Broke | बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाचे गर्डर तुटले, मोठ्या आवाजामुळे नागरिकांची पळापळ

Pune Crime News | मंडपातील पांढऱ्या कपड्यावरुन उठण्यास सांगितल्याने तरुणावर वार, गंज पेठेतील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक