Ashish Shelar On Uddhav Thackeray | आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भविष्यात म्हणतील गर्वसे कहो हम एमआयएम हैं’

मुंबई : Ashish Shelar On Uddhav Thackeray | मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. आता ‘समाजवादी’ (Samajwadi Party) शब्दावरून शेलार यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीकास्त्र सोडले आहे. (Ashish Shelar On Uddhav Thackeray)

आमदार आशिष शेलार यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची घोषणा गर्वसे कहो हम हिंदू है, अशी होती. आता उद्धव ठाकरे यांनी गर्वसे कहो हम समाजवादी हैं, अशी केली आहे. आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचल्यावर गर्वसे कहो हम एमआयएम हैं, असेही होईल. (Ashish Shelar On Uddhav Thackeray)

शेलार म्हणाले, पन्नास ठिगळे एकत्र करून गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. पक्षाचे तुकडे पडलेत आणि त्याला समाजवादाची ठिगळ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. माणूस विचारांशी किती प्रतारणा करू शकतो याचे जिवंत उदाहरण उद्धव ठाकरे आहेत.

शेलार पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी जाज्वल्य हिंदुत्व मांडले. त्यांच्या सुपुत्राने काय केले त्याची यादी मोठी आहे.
शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेन म्हटले आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी बसले.
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत बसवला.
बाळासाहेबांच्या सुपुत्राने अहमद पटेल यांच्या समोर कुर्नीसात घालणारे चित्र दाखवले. राम मंदिराच्या वर्गणीची चेष्टा केली. विशिष्ट वर्गाच्या मतासाठी लांगुलचालन केले. हे सर्व हिंदुस्थान आणि महाराष्ट्र पाहतोय.

शेलार म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूंच्या स्वागताशी भाजपाचा काहीही संबंध नाही.
बीसीसीआयचा सुद्धा नाही हा आयसीसीचा कार्यक्रम आहे. जो स्वच्छ आहे त्याने आम्हाला प्रश्न विचारावा.
उद्धव ठाकरे तुमच्या घरात दाऊदचा जावई पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियादाद यांना तुम्ही बिर्याणी खाऊ घातली.
ठाकरे सरकार असताना भारतावर हल्ला करणाऱ्यांना साथ देणाऱ्या याकूब मेमनच्या थडग्याला फुलांनी सजवले गेले.
त्यांनी आता आम्हाला प्रश्न विचारण्याची हिंमत करू नये.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhidewada Smarak Issue Solved | ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न निकाली! सुप्रीम कोर्टातील खटला
पुणे महापालिकेने जिंकला

Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा; भूसंपादनाशी निगडीत दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने

Meera Borwankar Explation On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी लिलाव केला नाही, हे सत्य, पण…’, मीरा बोरवणकर यांनी दिले स्पष्टीकरण

Gopichand Padalkar On Sharad Pawar | गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पुन्हा शरद पवारांना डिवचले, म्हणाले…

Chiplun Flyover Bridge Broke | बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाचे गर्डर तुटले, मोठ्या आवाजामुळे नागरिकांची पळापळ

Pune Crime News | मंडपातील पांढऱ्या कपड्यावरुन उठण्यास सांगितल्याने तरुणावर वार, गंज पेठेतील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक