Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही, काँग्रेसकडून आघाडी फुटण्याचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | विधान परिषदेच्या (Legislative Council) विरोधी पक्षनेतेपदावर (Opposition Leader) महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं असा दावा काँग्रेसने (Maharashtra Congress) केला होता. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shiv Sena MLA Ambadas Danve) यांची शिफारस केली. यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे (Deputy Chairperson Neelam Gorhe) यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Political Crisis) नाराजी आहे.

 

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही नैसर्गिक आघाडी नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. मात्र 2019 च्या निकालानंतर लोकशाहीचा तमाशा भाजपनं (BJP) केला. विपरीत परिस्थितीत आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. जनतेच्या हितासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) तो निर्णय घेतला होता. विरोधी पक्षात काम करण्याची आमची मानसिकता होती असेही पटोले यांनी सांगितले.

 

नाना पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी ही कायमची नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काँग्रेस स्वबळावर लढवायला तयार आहे.
एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची ही भूमिका काँग्रेसची नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही.
महाविकास आघाडी म्हणून यावर चर्चा व्हायला हवी होती.
चर्चा न करता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता निवडला गेला याला आमचा विरोध आहे, असे पटोले म्हणाले.
त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रस राहणार (Maharashtra Political Crisis) की बाहेर पडणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | signs of breaking up of maha vikas aghadi from congress nana patole statement on shiv sena decision over ambadas danve appointed leader of opposition vidhan parishad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा