Narhari Zirwal | 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस नाही तर…, नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल गुरुवारी लागणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निकाल देणार? यावर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काही तसांवर आला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेलेल्या 16 आमदारांना अपात्र (MLA Disqualified) का करु नये? असं नव्हतं तर त्या 16 आमदारांना अपात्र केलं होतं, असं नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी सांगितलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) पुढे म्हणाले, मी सर्व बाजूंनी अभ्यास करुन निर्णय घेतला. घटनेचा, सभागृहाचा, पक्षाच्या गटाचा, कोणाचे अधिकार कुणाला आहेत? याबाबत अभ्यास करुनच 16 आमदारांना अपात्र केलं होतं. कोर्ट 16 लोकांना अपात्र केलं आहे ते योग्य आहे असाच निर्णय देऊ शकतं, असं मत झिरवळ यांनी व्यक्त केलं.

त्यावेळी जो मी निर्णय दिला, मी दिलेला निर्णय कुठल्याही राजकीय आकसापोटी दिला नाही. सभागृह सार्वभौम आहे, ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तोच निर्णय दिला होता. मला विश्वास आहे की, न्यायदेवता सुद्धा माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल. सुप्रीम कोर्टाने निर्णयाचा अधिकार विधिमंडळाला घ्यायला सांगितला, तर तो मलाच द्यावा लागेल, कारण मीच त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष होतो. आता मी अध्यक्ष नसलो तरी तिथल्या प्रक्रियेत एक संविधानिक पदावर आहे, असं झिरवळ यांनी म्हटले.

माझ्यासमोर जर निकाल देण्याची स्थिती आली, तर माझ्यासमोर एवढ्या दिवस झालेला युक्तीवाद आहे.
मी घटनेला अनुसरुनच निर्णय दिला होता, त्यामुळे त्यात बदल करण्याचे काही कराण नाही.
न्यायालय निर्णय घेणार की नाही? यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, एखाद्या कायदेशीर प्रक्रियेबाबत
सभागृहात तोडगा निघत नसेल तर त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्ट आहे.
कारण हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत नसल्याचे झिरवळ यांनी सांगितले.

Web Title :-  Narhari Zirwal | narhari zirwal big claim about 16 mlas of eknath shinde maharashtra political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार, मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, ते 16 आमदार कोण? संपूर्ण यादी

Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर उद्या निकाल, राज्यात हालचालिंना वेग; दोन्ही गटाचे शिलेदार दिल्लीला रवाना