Maharashtra Political Crisis | ‘काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं…’ अनिल परब यांनी निकालातील ठळक मुद्दे वाचून दाखवले (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सविस्तर निकाल दिल्यानंतर राज्यात प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून निकाल त्यांच्यासाठी योग्य असल्याचा (Maharashtra Political Crisis) दावा केला आहे. तर ठाकरे गटाने ते मुद्दे खोडून काढले आहेत. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांना थेट इशारा दिला आहे. जर वेडवाकडं काही केलं तर पुन्हा न्यायालयात जाऊ असे ठाकरे म्हणाले. यावेळी अनिल परब (Anil Parab) यांनी ठाकरे गटचा पुढचा प्लॅन ऑफ अॅक्शन काय असेल याची माहिती दिली.

अनिल परब यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर काही प्रश्न उपस्थित केले. काल त्यांनी सर्व अर्धवट माहिती सांगितली, असा आरोप परब यांनी केला. परब यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या (Maharashtra Political Crisis) प्रतमधील काही ठळक मुद्दे वाचून दाखवले. राज्यातील सत्तासंघर्षावर न्यालयाने निर्णय देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द केली आह. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचाच व्हिप लागू होणार असल्याचा दावा, परब यांनी केला.

ठाकरेंनी नेमलेला गटनेता आणि व्हिप योग्य, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाचा (Shinde Group) बचाव होणार नाही.
राज्य सरकार हे बेकायदेशीर आहे, असा आरोप परब यांनी केला.
एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही रद्द केली आहे. त्याच्यावर निकालातून शिक्कामोर्तब झालं आहे.
अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची गटनेतेपदी निवड न्यायालयाने योग्य ठरवली आहे.
त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
तसेच निकालाची प्रत घेऊन अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे परब यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title :- Maharashtra Political Crisis | ‘Yesterday they told everything in half…’ Anil Parab read out the highlights of the verdict (VIDEO)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

Uddhav Thackeray On Rahul Narvekar | ‘जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…’, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा (व्हिडिओ)

Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी