Maharashtra Political News | ‘भाजपचे अनेक मंत्री भ्रष्टाचारी, भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे, लवकरच पर्दाफाश केला जाईल’, काँग्रेस नेत्याचा दावा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक (India Alliance Meeting) 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज (शनिवार) मुंबईत (Mumbai) बैठक झाली. बैठकीच्या तयारीसाठी मविआ मधील तिन्ही पक्षातील प्रत्येकी 5 नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे. (Maharashtra Political News) काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली हा गट काम करणार असून ही बैठक यशस्वी करण्यसाठी तिन्ही पक्ष जोमाने काम करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी दिली.

महाविकास आघाडीची बैठक आज वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ते म्हणाले, आजच्या बैठकीमध्ये मुंबईतील बैठकीबाबत चर्चा झाली. मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होईल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (Congress National President) मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), संसदीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, यांच्यासह महत्त्वाच्या व्यक्ती या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याची माहिती राज्य सरकारला देण्यात येईल, असे नाना पटोले म्हणाले.

बैठकीसाठी समितीची स्थापना

मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीची बैठक यशस्वी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्य़ाध्यक्ष (State Working President) माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan), मुंबई काँग्रेस अध्यक्षा (Mumbai Congress President) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील (Satej alias Bunty Patil), माजी खासदार संजय निरुपम (Former MP Sanjay Nirupam) हे या समितीमध्ये असणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

भाजपच्या भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे

नाना पटोले म्हणाले, दुसऱ्यांना भ्रष्टाचारी (Corruption) म्हणणाऱ्या भाजपाचा (BJP) भ्रष्ट चेहरा आम्ही उघड करणार आहोत. शिंदे सरकारमध्ये (Shinde Government) भाजपचे अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे आहे. लवकरच त्यांचा पर्दाफाश केला जाईल. जलसंपदा विभागात (Water Resources Department) 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देशाचे पंतप्रधान करतात व दोन दिवसात त्या पक्षाला सत्तेत सहभागी करुन घेता, हे कसे काय? भाजपकडे आले की पवित्र होतात का? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.

आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar),
शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Chief) व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray),
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat),
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar),
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan),
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh),
खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai),
खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), अनिल देसाई (Anil Desai) आदी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group | क्रिकेटर अंकित बावणेचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी सहकार्य करार