Maharashtra Political News | भिडेंचा वापर करुन भाजपला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? काँग्रेसचा थेट सवाल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे महापुरुषांबद्दलची विधाने अवमानकारक असतात. भाजपला (BJP) भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्राचा मणिपूर (Manipur Violence) करायचा आहे का? असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी केला आहे. तसेच भीमा कोरेगाव घटना (Bhima Koregaon Incident) घडली, त्यासाठी भिडे जबाबदार होते. दोन ते तीन दिवसांत त्यांना अटक (Arrest) केली नाही तर पुन्हा विधिमंडळात (Maharashtra Political News) हा प्रश्न उचलू, असा इशारा पटोले यांनी दिला. ते शनिवारी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी लावणार का? महाराष्ट्रातील लोक संयम ठेवून आहेत. त्यांची परीक्षा घेऊ नका. (Maharashtra Political News) संयम सुटला तर लोक त्यांना पळता भुई थोडे करतील, असा इशारा पटोले यांनी दिला. मोदी हे पुरस्कार स्वीकारुन पंतप्रधान (PM Narendra Modi) पदाचा अवमान करत आहेत. काँग्रेस पक्ष भाजप विरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार-Sharad Pawar) काय करावे हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे की भाजप विरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे.

तेलंगणातील धरणामुळे राज्यात पूर

चंद्रपूर येथे गेल्या दोन वर्षात पूररेषा ओलांडून घरे बांधण्यात आलेली नाहीत. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणात बांध बांधले, त्यामुळे गोदावरी नदीला पूर (Godavari River Flood) येत आहे. तेलंगणात धरण बांधल्यामुळे पुराचा फटका महाराष्ट्राला बसत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

गुजरातमधील लोकांनी नाणारमध्ये जमिनी घेतल्या

भाजपच्या संबंधित असलेल्या गुजरातमधील लोकांनी नाणार येथे जमिनी घेतल्या आहेत.
जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे.
मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हे प्रकार आहेत. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांची नावे सरकारने जाहीर करावी,
अशी मागणी पटोले यांनी केली.

नागपुरात लोकं सुरक्षित नाहीत

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था (Law and Order) योग्य नाही.
फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात ही लोकं सुरक्षित नाहीत.
नागपुरात एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे, त्यांची परीक्षा घेऊ नका.
विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी यांना निधी दिले नाहीत, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही पटोले यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Journalist Joseph Pinto Passes Away | विद्यार्थीप्रिय शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ पिंटो यांचे निधन