Maharashtra Political News | ‘…आता लपून छपून कशाला, अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना आपण राष्ट्रवादीच (NCP) राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यानंतरही अजित पवारांबद्दल चर्चा सुरुच आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठं विधान केलं. आहे. अमुक जागा मिळणार आहे, आता अमुक कशाला, असं लपुन छपून बोलण्यात (Maharashtra Political News) काही अर्थ नाही. अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी (Chief Minister) बसणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

 

पुण्यातील एका वृत्तसमुहाच्या वतीने अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल (Maharashtra Political News) भाष्य केलं. अमुक जागा मिळणार आहे, आता अमुक कशाला, असं लपुन छपून बोलण्यात काही अर्थ नाही. अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच वाटतंय, नव्या उमेदीचा, 21 व्या शतकातील तिसरं दशक सुरु आहे, एक गतीमान मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहायला मिळवा. किमिटमेंट पाळणारा मुख्यमंत्री मिळावा, असं विधान सुनील तटकरे यांनी केले आहे.

 

सुनील तटकरे पुढे म्हणाले, मला अनेक नेत्यांचा सहवास मिळाला, स्वर्गीय वसंतदादा (Late Vasantdada),
शंकरराव चव्हाण (Shankarao Chavan) आणि विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)
यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम केलं. पहिल्यांदा दादांची भेट झाली त्यावेळी कळलं ‘मॅन ऑफ कमिटमेंट…एकच वादा अजितदादा’ ही
ओळख नंतर झाली. पण शब्दाला पक्का असणारा माणूस म्हणजे अजित पवार,
अशा शब्दात सुनील तटकरे यांनी अजित पवारांचे कौतुक केले.

 

Web Title :- Maharashtra Political News | ncp leader ajit pawar will be the chief minister of maharashtra says sunil tatkare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

CM Eknath Shinde | प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे