Maharashtra Political News | सौंदर्यामुळेच प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी, संजय शिरसाटांचं विधान; प्रियंका आणि आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांच्या एका विधानामुळे ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यात जोरदार जुंपली आहे. शिरसाट यांच्या विधानावरुन सुरु झालेलं वाकयुद्ध थांबता थांबत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनी संजय शिरसाट हे गद्दार आणि असभ्य चारित्र्याचे असल्याचे (Maharashtra Political News) म्हटले आहे. तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील शिरसाट सडक्या विचारांचे असल्याचे म्हणत हल्लाबोल केला आहे.

संजय शिरसाट म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचं चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले होते. (Maharashtra Political News) संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

प्रियंका चतुर्वेदींनी ट्विट करुन सुनावलं

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने (BJP) त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे.

आदित्य ठाकरेंनी फटकारले

प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संजय शिरासट यांना फटकारलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दार आमदारांना त्यांची किंमत कळलेली आहे.
अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात अजून टिकले कसे हा प्रश्न पडतो आणि दु:ख देखील होतं.
पण जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असं मला वाटतं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune: PCMC Disburses Rs 10.09 Crore To Bank Accounts Of Over 28K Students Under DBT Scheme

Bipasha Basu | 9 वर्षे चित्रपटांमध्ये काम केले नसले तरी बिपाशा जगते लग्जरी आयुष्य; कोट्यवधी रुपयांची मालकीण

Crop Insurance | पीक विमा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून 3 दिवसांची मुदतवाढ, महाराष्ट्र शासनाच्या विनंतीला केंद्राची मंजुरी

Pune Fire News | संभाजी उद्यानातील मत्स्यालयाला आग; वातानुकुलित यंत्रांनी घेतला पेट