Maharashtra Political News | ‘… तर ते कुत्र्याला भुंकायला सांगू शकतात’, उद्धव ठाकरेंचे नाव घेत शिवसेना नेत्याची जितेंद्र आव्हाडांवर घणाघाती टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | रामनवमी आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) राज्यात दंगली (Riot) घडवण्यासाठी आहेत की काय, असं वाटायला लागलं आहे. असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप (Maharashtra Political News) सुरु झाले आहेत. अशातच आता शिवसेना नेते किरण पावसकर (Shiv Sena Leader Kiran Pavaskar) यांनी या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

 

किरण पावसकर म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणतात की मी हिंदुत्वापासून (Hindutva) दूर गेलो नाही, मग ते राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना अशी हिंदुत्वविरोधी वक्तव्ये करण्यापासून थांबवतील का? नाही तर त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही हे नाटक बंद करावं. ते जर असं सांगू शकत नसतील तर कुत्र्याला भुंकायला सांगू शकतात, अशा शब्दात पावसकर यांनी टीका केली आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

रामनवमीच्या दिवशी संभाजीनगर मध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहेत की काय, असं वाटायला लागले आहे. खरं तर येणारे वर्ष हे जतीय दंगलीचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील (Maharashtra Political News) युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत.
महागाई कमी करु शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करुन मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही,
असं जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पक्षाच्या शिबिरात म्हटले होते.

 

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. By Babasaheb Ambedkar)
मोकळा श्वास आणि मन मोकळं करायचा अधिकार दिला आहे.
त्यामुळे जर कोणी काही वक्तव्य केलं असेल तर त्यावर लगेच गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे.
सर्वच राजनेत्यांनी ही पद्धत थांबवली पाहिजे. कोणीही काहीही बोललं असेल तर लगेच केस न करता
आपण सर्वांनी मिळून तारतम्य बाळगलं पाहिजे, लगेच केस कारण यावर विचार केला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Web Title :- Maharashtra Political News | then they can tell the dog to bark kiran pavaskars criticism of the challenges challenging uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार