Maharashtra Political News | ‘100 रुपयांचीही ऑफर नाही, हेच अमित शहांच्या…’, आमदार सुनील राऊतांच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरु आहेत. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाची ताकद वाढवण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Political News) करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ताकद वाढताना दिसत आहे. यातच खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे बंधू आमदार सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनील राऊत यांनी केलेल्या दाव्यावर प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले सुनील राऊत?

मला शंभर कोटी रुपयांची ऑफर आली होती आणि आज सुद्धा ऑफर आहे. कारण मी स्वत: आमदार आहेच. पण, माझा ब्रँड संजय राऊत माझ्या मागे असल्याने मला शंभर कोटींची ऑफर आहे, अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. (Maharashtra Political News) शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असे सुनील राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.

त्यांना कोणी 100 रुपयांचीही ऑफर देणार नाही

आमदार नितेश राणे म्हणाले, सुनील राऊत यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. सुनील राऊत यांनी काही शुन्य जास्त लावले आहेत. त्यांना 100 रुपयेही देणार नाही. संजय राऊत तुरुंगात असताना हेच सुनील राऊत अमित शहांच्या (Amit Shah) दिल्लीतील घराबाहेर चार तास उभे होते. भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर जाऊन चार तास थांबले होते. काही करा, आम्ही भाजपमध्ये येण्यास तयार आहोत, पण आम्हाला बाहेर काढा, अशी विनवणी करत असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.

भाजप समोर गुडघे टेकले नाहीत

शिवसैनिकांशी संवाद साधताना सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत यांनी भाजपसमोर जर गुडघे टेकले असते तर
ते साडेचार महिने तुरुंगात गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हते. ते जेलमध्ये असतानाचे ते साडेचार महिने
माझ्या घरच्यांनी कसे काढले ते फक्त आम्हालाच माहित आहे. सगळे काही सहन केले पण पक्ष सोडला नाही.
सोडणारही नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती