Maharashtra Politics News | जागा वापटाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान, म्हणाले – ‘जागा वाटपाचा निर्णय…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha Constituency) स्थानिक भाजप (BJP) पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Eknath Shinde) यांची जागा धोक्यात आली आहे. तर भाजपमधील स्थानिक नेते विविध मतदारसंघावर दावा (Maharashtra Politics News) करत असल्याने शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठे विधान केले आहे.

वेगवेगळ्या ठिकाणचे नेते जर काही दावे करत असतील, आम्हाला सांगत असतील तरी त्यात काही तथ्य नाही. लोकसभेचे जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ (Parliamentary Board ) घेणार आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत केंद्रीय संसदीय मंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात जागावाटपाचा निर्णय घेणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Maharashtra Politics News)

श्रीकांत शिंदेमध्ये खूप क्षमता आहे

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांना येथून कोणीही हलवू शकत नाही. भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा देतील, असे बावनकुळे म्हणाले. ते काल (रविवार) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजप-शिंदे गटातील वादावर बोलताना बावनकुळे म्हणाले, डोंबिवली येथील भाजपचे बुथप्रमुख एकनाथ शिंदे
यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा देणार आहेत.
श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी तेथून कोणीही हलवू शकणार नाही.
मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जास्त मतांनी त्यांना निवडून आणू.
ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, त्यांची क्षमता खूप आहे. भाजप तेवढ्याच ताकदीने श्रीकांत शिंदे यांना मदत करेन.

Web Title :  Maharashtra Politics News | big statement of chandrashekhar bawankule seat sharing under pm modi leadership no one has authority in the maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – फिर्याद दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी पकडले चोरट्यांना

Maharashtra Politics News | अजित पवार परत आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं, सामनातील अग्रलेखावरुन राष्ट्रवादीचा संजय राऊतांवर पलटवार

Nitin Gadkari Warn Contractor | ‘कामात गडबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकेल’; गडकरींचा कंत्राटदाराला थेट इशारा

NCP Chief Sharad Pawar | एकाचवेळी 2 कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का? ठाकरे गटाचा अग्रलेखातून सणसणीत सवाल

Maharashtra Politics News | ‘याला चोमडेपणा म्हणतात, राऊतांनी ठाकरेंच्या कानात सांगून…’, अमित शहांवर केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर