Maharashtra Politics News | ‘रिक्षावाला घाम गाळतो, कुठलाही व्यवसाय नसताना आदित्य ठाकरेंच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दिग्गज नेते आहेत. ते रिक्षावाल्याच्या (Rickshawala) हाताखाली कसं काम करणार? असं विधान करुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केले होते. महाविकास आघाडीचे सरकार (Government of Mahavikas Aghadi) बनवत असताना (Maharashtra Politics News) मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली होती. यात शरद पवारांनी (Sharad Pawar) असं विचारल्याने उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनण्याची वेळ आल्याचा दावा सावंत यांनी केला होता. त्यानंतर यु-टर्न घेत सावंत यांनी रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही तर माझा असल्याचे सांगितले. तसेच ती आमची भाषा आहे. शरद पवार बोलले नाहीत अशी सारवासारव केली. मात्र, आता यावरुन भाजपने (BJP) ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संदर्भात ‘रिक्षावाला’ हा व्यावसायिकतेचा उपरोध करणारा शब्द शरद पवार यांनी वापरला नसून तो आपण वापरला अशी कबुली देऊन ठाकरे गटाचे शिल्लक खासदार अरविंद सावंत यांनी आपल्यावरील राजकीय संस्काराचे दर्शन (Maharashtra Politics News) घडविले आहे. हा शिंदे यांचा अपमान तर आहेच, पण उदरनिर्वाहासाठी घाम गाळणाऱ्या रिक्षाचालकांच्या व्यवसायाचाही अपमान आहे. या देशात आणि जगात सर्वत्र श्रमाला प्रतिष्ठा आहे, याचे संस्कार सावंत यांना राजकीय उंचीवर नेऊन बसविणाऱ्या ठाकरे सेनेतही नाहीत याचा हा आणखी एक पुरावा आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

उपाध्ये पुढे म्हणाले, याआधीही या गटाचे संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व स्वतः उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांच्यासह सर्व बंडखोरांना त्यांच्या व्यावसायिक स्तरावरून हिणविले आहे. ठाकरे कुटुंब हेच या सर्वांचे उद्धारकर्ते आहेत आणि या कुटुंबाच्या उपकारांमुळेच हे नेते मोठे झाले अशा आशयाची दर्पेक्ती करताना, या नेत्यांनी आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले कष्ट आणि खाल्लेल्या खस्ता यांचा ठाकरे कुटुंबास कृतघ्न विसर पडला. मुख्यमंत्री शिंदे यांना शरद पवार यांच्या नावाआडून रिक्षावाला असे हिणविणाऱ्या सावंतांनी याच संस्कृतीचा कित्ता गिरविला आहे.

व्यावसायिक प्रतिष्ठा पाहूनच कोणी कोणाच्या हाताखाली काम करायचे हा निकष महाविकास आघाडीच्या नेतानिवडीत
असेल, तर आदित्य ठाकरे यांच्या हाताखाली काम करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीतील ते दिग्गज तयार झाले असते का?
कारण, व्यवसायाचा नेमका तपशील जाहीर नसतानाही,
आदित्य ठाकरे कोट्यावधीची मालमत्ता आदित्य ठाकरेंच्या नावावर जमा होती.
अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिणविल्यामुळे,
श्रीमंती आणि धनसत्ता हे नेतृत्वगुणाचे लक्षण मानणारी ठाकरे गटाची मानसिकता स्पष्ट झाली आहे.
व्यवसायावरून सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर ठरविणाऱ्या या मानसिकतेचा निषेध व्हायलाच हवा,
असंही केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

Web Title :-  Maharashtra Politics News | bjp leader keshav upadhyay criticized the uddhav thackeray over arvind sawants rickshawala statement
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Benefits of Millet | चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया !

Ajit Pawar | ‘अशोक चव्हाण भाजपत जाणार’, शिरसाट यांच्या दाव्यावरुन अजित पवारांचा टोला, म्हणाले-‘पिंजऱ्यातील पोपटाने…’

Pune ACB Trap | 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा