Maharashtra Politics News | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंची तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंच्या भविष्याची चिंता, पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले’, भाजपचे टीकास्त्र

Maharashtra Politics News | bjp slams opposition unity trolls sharad pawar uddhav thackeray aditya supriya sule
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) हे देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नितीश कुमार यांनी देशभरातील अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन एकत्र येण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना नितीश कुमार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पटणा येथे होत असलेल्या विरोधकांच्या (Maharashtra Politics News) बैठकीसाठी निमंत्रित केले होते. आज पाटणा येथे विरोधकांची बैठक होत असून या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut), शरद पवार, प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel), सुप्रिया सुळे (Supriya Sule) पटण्याला रवाना झाले आहेत. विरोधकांच्या या बैठकीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली आहे.

विरोधकांना जनतेची नाही तर मुलांची चिंता

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वत:च हित जपण्यासाठी एकत्र आले आहेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Maharashtra Politics News)

पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले

सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करु इच्छितात. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भिवष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहेत. 2019 सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं. आता 2024 मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहेत, असं बावनकुळे यांनी म्हटले.

Web Title : Maharashtra Politics News | bjp slams opposition unity trolls sharad pawar uddhav thackeray aditya supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall

Total
0
Shares
Related Posts