Maharashtra Politics News | ‘बेडूक फुगतो की सुजतो हे…’, भाजप खासदार अनिल बोंडेंच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | गेल्या दोन दिवसांपासून लोकप्रियतेवरुन शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपमध्ये (BJP) कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याची जाहिरात कथित शिंदे गटाकडून देण्यात आली होती. ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रामध्ये शिंदे’ असा मजकूर या जाहिरातीवर (Advertising) छापला होता. या जाहिरातीवरुन शिंदे गट व भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर (Maharashtra Politics News) टीका केली जात आहे.

भाजपचे खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली.
‘बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही’ अशी टीका बोंडे यांनी केली होती.
बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर (Maharashtra Politics News) केलेल्या टीकेला शिंदे गटाचे नेते भरत गोगावले
(Bharat Gogawale) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल, अशा शब्दात गोगावले
यांनी बोंडे यांच्यावर पलटवार केला आहे.

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबाबत भरत गोगावले यांना विचारले असता ते म्हणाले,
आता मगाशी माझी उपमुख्यमंत्र्यांबरोबर यासंदर्भात चर्चा झाली आहे.
त्यांनी तिथूनच त्या लोकांना फोन करु काय सांगायचंय ते सांगितलं आहे.
त्यामुळे आता आम्ही त्या खोलात जास्त शिरत नाही. वरच्या स्तरावर याचा विचार केला जाईल.
बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल, असे गोगावले म्हणाले.

Web Title :  Maharashtra Politics News | CM eknath shinde group mla bharat gogawale reaction on anil bonde statement eknath shinde called him frog

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी हॉस्पीटलमधील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन PhonePe व्दारे घेतली लाच; सापळा कारवाई दरम्यान ‘कॅश’ घेताना रंगेहाथ पकडले

Pune ACB Case | अ‍ॅन्टी करप्शनची पथके पुण्यातील ‘त्या’ 2 पोलिसांच्या मागावर

Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)