Maharashtra Politics News | ‘काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत’, ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये तिन्ही पक्षांनी (Maharashtra Politics News) मिळून ठरवलेल धोरण सांगत असताना घेतलेली भूमिका वेगळी दिसून येत असल्याचे ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीचे (NCP) नेते संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

भाजप बेछूट आरोप करणारी पार्टी

भाजपवर (BJP) टीका करताना भास्कर जाधव म्हणाले, भाजप ही एकेकाळी सभ्य पार्टी होती.
मात्र आता ती बेछूट आरोप करणारी पार्टी झाली आहे. आमच्या पक्षात फूट पडण्याला भाजप जबाबदार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मात्र या लोकांना तोंड देत आहेत. आतापर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) झाल्या. तर चार दिवसांपूर्वी मविआची एक बैठक पार पडली. यात जो धोरणात्मक निर्णय झाला त्यापेक्षा नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी आपल्या (Maharashtra Politics News) मुलाखती देताना घेतलेली भूमिका वेगळी आहे. हे लोक संभ्रम निर्माण करु पाहात आहेत, असंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं.

संभाव्य लढाईच्या दृष्टीने सजग असावे म्हणून…

भास्कर जाधव पुढे म्हणाल, आमच्या पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतानाही जे लोक
पाठिंबा देण्यासाठी येत होते तेव्हा त्यांनी लोकांना भेटण्याचं काम केलं. पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधला.
राज्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या. आता त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पदाधिकारी संभाव्य लढाईच्या दृष्टीने सजग असावेत यासाठी आजची बैठक बोलवली असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केलं.

Web Title :  Maharashtra Politics News | congress and ncp creating confusion on mva said thackeray group leader bhaskar jadhav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून 23 जणांची 43 लाखांची फसवणूक; क्लिक अँड ब्रश कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

ACB Trap News | बिल्डरकडून 2 लाखाची लाच घेणारा वरिष्ठ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Police Crime News | घोरपडे पेठेत क्रिकेट खेळणार्‍या युवकांनी सोनसाखळी चोरास पाठलाग करून पकडले; ACP सतीश गोवेकर, Sr PI संगीता यादव यांच्याकडून धाडसी तरूणांचा सत्कार