Maharashtra Politics News | एका पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत धुमसतंय?, MP श्रीकांत शिंदेंचा राजीनाम्याचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | एका पोलीस अधिकाऱ्यामुळे ठाणे-कल्याणमध्ये सध्या भाजप-शिवसेना युतीमध्ये (BJP-Shiv Sena Alliance) ठिणगी पडली आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली (Police Officer Transfer) होत नाही तोपर्य़ंत शिवसेनेसोबत आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Eknath Shinde) यांच्यासोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण लोकसभा निवडणूक (Kalyan Lok Sabha Election) आढावा बैठकीत (Maharashtra Politics News) घेतला होता. रवींद्र चव्हाण (Maharashtra PWD Minister Ravindra Chavan) यांनी देखील असा ठराव होणे म्हणजे फार गंभीर असल्याचे सांगत कार्यकर्त्यांच्या भावना जपणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील आता भाजपच्या काही नेत्यांना स्वार्थी असे म्हणत आपण भाजप-शिवसेना युतीसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच वेळ पडली तर आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) देखील देऊ अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देणे म्हणजे शिवसेना-भाजप मध्ये मोठी दरी पडू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics News)

केंद्रात मोदींचं सरकार यावं हेच आपलं ध्येय असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत हे आपलं ध्येय आहे. देशातील तमाम जनतेचाही तसा निर्धार आहे. पण डोंबिवलीमधल्या काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारण सुरु असून शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा टाकला जात आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय युतीमधील वरिष्ठ नेते घेतली. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी आम्ही एकदिलाने प्रचार करुन त्याला विजयी करु, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

 

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नुकतीच भाजपची आढवा बैठक पार पडली.
यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या नऊ वर्षे पूर्तीनिमित्ताने अभिनंदन ठराव मांडला.
त्याला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.
यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले (Gulabrao Karanjule)
यांनी जोपर्यंत पोलीस निरीक्षक शेखर बगाडे (PI Shekhar Bagade)
यांची बदली होत नाही तोपर्य़ंत शिवसेनेचे काम न करणे,
कार्यक्रमात सहभागी न होणे असा प्रस्ताव मांडला. याला उपस्थित सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि ठराव पारित करण्यात आला. भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपच्या इतर स्थानिक नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

 

Web Title : Maharashtra Politics News | mp-shirkant-shinde-resignation-warning-shivsena-bjp-
kalyan-loksabha maharashtra pwd minister said i will …


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा