Maharashtra Politics News | ‘अफझल खान असेल किंवा औरंगजेब, छत्रपतींच्या महाराष्ट्रात…’, नगरमधील ‘त्या’ घटनेवरुन अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | अहमदनगरच्या फकीरवाडा भागात रविवारी संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशहा औरंगजेबाच्या (Aurangzeb) प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. तसेच त्यांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या घटनेवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. (Maharashtra Politics News) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला, महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन केलं जातंय का? यावर अजित पवार म्हणाले, औरंगाजेबाचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही.
अजित पवार पुढे म्हणाले, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन कसं कोणी करेल आणि ते का करावं? उगीचच त्या घटनेला वेगळ स्वरुप देऊ नका. अफझल खान (Afzal Khan) असेल किंवा औरंगजेब असेल या लोकांचे समर्थन करण्याचे काहीच कारण नाही. कोणीही त्यांचं समर्थन करणार नाही. (Maharashtra Politics News) अशा प्रकारच्या बातम्या पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल, समजात एकमेकांबद्दल अडी निर्माण करण्याचं किंवा तेढ निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
तसेच आपण राज्यात जातीय सलोखा टिकवला पाहिजे. पिढ्यान पिढ्या आपण सगळेजण गुण्यागोविंदाने एकत्र राहतोय. त्याला कुठलाही डाग लागता कामा नये, असेही अजित पवार म्हणाले.
कोल्हापूर दंगलीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
कोल्हापूरमध्ये (Kolhapur Riots) आज निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या (Law and Order)
प्रश्नावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले,
यापूर्वीही काही शहरात दंगली घडवून आणण्याचे प्रकार झाले आहेत. यातून राज्यातील कायदा व सुव्यवस्था
अडचणीत येत आहे. यामागे नेमके कोण आहेत याचा तपास करण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री आणि वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची आहे.
येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून राज्यातील समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का? अशी शंका अजितदादांनी उपस्थित केली.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
https://twitter.com/NCPspeaks/status/1666398649444864000?s=20
एखाद्या घटनेचा तपास योग्यप्रकारे करता येऊ शकतो. मात्र यासाठी राज्यकर्त्यांची भूमिकाही तशी असावी लागते,
असे स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केले. आज कोल्हापूरमध्ये तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलिस यंत्रणेकडे अशी परिस्थिती हाताळण्याची संपूर्ण माहिती असते. फक्त मागे राजकीय इच्छाशक्ती हवी
आणि अशा घटना घडू देऊ नयेत, असा सरकारचा अधिकाऱ्यांना आदेश असावा, असे अजित पवार म्हणाले.
Web Title : Maharashtra Politics News | NCP leader ajit pawar says no reason to support aurangzeb on sandal procession in ahmednagar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा