Maharashtra Politics News | ‘वाद करत बसण्यापेक्षा आधी…’, केंद्रीय मंत्र्याचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. विविध मुद्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Maharashtra Cabinet Expansion) शिंदे गटासह मित्र पक्षांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि आरपीआयचे नेते (RPI Leader) रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) खोचक टोला लगावला. (Maharashtra Politics News) वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा, असे आठवले म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

वाद करण्यात आणि मिटवण्यात आम्ही अॅक्टिव्ह आहोत. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली त्यात आमचा वाद मिटला. राज्यातील (Maharashtra Politics News) अनेक प्रश्न अद्याप संपले नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार करा, कार्यकर्त्यांना, लोकांना कामाला लावा. उगाच वाद करत बसू नका. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमच्या पक्षालाही प्रतिनिधित्व द्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

मविआने आम्हाला सांगू नये

जाहिरातीवरुन सध्या भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, असे उगाच वाद करत बसू नका, एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली आणि वाद मिटला खरा. मात्र आम्ही वाद करण्यात अॅक्टिव्ह आहोत तसेच वाद मिटवण्यातही अॅक्टिव्ह आहोत हे दिसून आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) त्याबाबत आम्हाला सांगू नये, असा पलटवार आठवले यांनी केला.

लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा

महाराष्ट्रासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. दीड-दोन वर्षाचा काळ निवडणुकीला राहिला आहे. एकाच मंत्र्याकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करा. महामंडळावर नियुक्ती करण्यात यावी. लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत. हे करत असताना आमच्याही पक्षाला गृहीत धरुन मंत्रिमंडळात समावेश करुन घ्यावा, असेही रामदास आठवले म्हणाले.

वाद न करता एकत्र काम करा

सध्या दलित आत्याचाराच्या घटना वाढत आहेत, यासाठी काम करावे.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला होता. त्यांच्यासाठी पंधराशे कोटीचा निधी मंजूर केला आहे.
तो तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आपापसांत वाद करत बसू नये.
एकत्र काम करावे अशी आमची भूमिका आहे, असेही आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले.

Web Title :   Maharashtra Politics News | ramdas athawale reaction over bjp and shivsena advertisement dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘दादालाही वेलविशर शोधायला सांगितलंय’, शिंदेंच्या जाहिरातीवरून सुप्रिया सुळेंचा टोला (VIDEO)

Pune PMPML Administration | पीएमपीएमएलकडून स्वारगेट आणि मार्केटयार्ड परिसरातून मुळशी तालुक्यात जाणारे 11 मार्ग पुन्हा सुरू

Maharashtra Politics News | दादा, आमच्यासोबत या, शिंदे गटाच्या मंत्र्याची अजित पवारांना खुली ऑफर