Maharashtra Politics News | ‘नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी अगोदर आपल्या वडिलांना…’, राणांच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला होता. राणा यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नवनीत राणा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची लायकी (Maharashtra Politics News) नाही, असे सांगत ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी राणांवर सडकून टीका केली आहे.

 

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, उद्धव ठाकरे आपले घर सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारांवर तुमचे 40 आमदार निवडून आले, ते तुम्हाला सांभाळता आले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) जिवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले, ती विचारधारा तुम्ही सांभाळू शकला नाहीत. बाळासाहेब ठाकरेसुद्धा (Maharashtra Politics News) अश्रू ढाळत असतील की ज्या मुलाला जन्म दिला, त्याने माझी विचारधारा ‘मातोश्री’त ठेवली नाही, अशी टीका नवनीत राणांनी केली होती.

 

पहिल्यांदा आपल्या वडिलांना शोधावं

नवनीत राणांच्या टीकेवर पलटवार करताना मनिषा कायंदे म्हणाल्या, नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना शोधून काढावं. ते फरार असून, अद्याप पोलिसांना सापडले नकी नाही, याची माहिती नाही. त्यामुळे स्वत: केलेल्या भानगडी पहिल्यांदा सोडवाव्यात. नंतर शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलावे. उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याची नवनीत राणांची लायकी नाही, असा घणाघात कायंदे यांनी राणा यांच्यावर केला.

 

शिवसेना धमक्यांना घाबरत नाही

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना त्या म्हणाल्या,
बावनकुळे काय बघून घेणार आहेत? महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला ओळखले आहे.
तुम्ही महाराष्ट्रात खेळ केला असून, कपटकारस्थान रचत सरकार स्थापन केलं.
त्यामुळे शिवसेना कधीही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे मनिषा कायंदे यांनी सुनावलं.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | shivsena thackeray group manisha kayande
replied navneet rana criticism on uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा