Maharashtra Politics News | भास्कर जाधवांची जीभ घसरली, म्हणाले – ‘बावनकुळे वेस्ट इंडिजचे एम्ब्रोस सारखे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादग्रस्त विधान (Controversial Statement) करण्याची स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळत आहे. आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Thackeray Group MLA Bhaskar Jadhav) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडिजच्या (West Indies) खेळाडूसारखे दिसतात, असे विधान भास्कर जाधव यांनी केले आहे. त्यांच्या टीकेला भाजपने (BJP) देखील प्रत्युत्तर देताना ‘भास्करशेठ, भारतीयांना रंगावरून (Maharashtra Politics News) हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही (British) भारतीयांनी घालवले आहे, तुम्ही कोण लागलात? अशा शब्दात पटवार केला आहे.

 

काय म्हणाले भास्कर जाधव?
मी जरा बारकाईने पाहिले. हे बानवकुळे महाराष्ट्रातले आहेत पण दिसतात वेस्ट इंडिच्या प्लेअरसारखे. मग कोण म्हणालं व्हिव्हियन रिचर्ड्स (Vivian Richards), पण तो मजबूत होता, पॅट्रिक पॅटरसन (Patrick Patterson) दिसतो तसा हा दिसतो का?नाही. कोर्टनी वॉल्शसारखा (Courtney Walsh) दिसतो का नाही? ब्रायन लारा (Brian Lara) दिसतो का? नाही. मग माझ्या लक्षात आलं की एम्ब्रोस (Curtly Ambrose) सारखा दिसतो. जुन्या लोकांना माहिती असेल एम्ब्रोस कसा दिसतो ते. कदाचित बावनकुळे त्यांना लाजवतील, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.

आपण वेस्ट इंडिजच्या प्लेअरसारखे दिसतो, पण ते खेळणारे होते. तुम्ही कोणाबरोबर खेळताय? उद्धव ठाकरेंबरोबर (Uddhav Thackeray). एक बॉलमध्ये तुमची विकेट कधी काढतील, पत्ता लागणार नाही, अशी टीका जाधव यांनी केली.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंचे प्रत्युत्तर
भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उपाध्ये यांनी ट्विट करत जाधव यांच्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘भास्करशेठ, भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे, तुम्ही कोण लागलात?’

 

ब्रिटिशांनी भारतीयांना गोऱ्या कातडीच्या अहंकारातून हिणवले, भारतीयांना कृष्ण वर्णावरून अपमानित केले. उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी ब्रिटिशांच्या याच मानसिकतेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रंगावरून, त्यांच्या दिसण्यावरून अपमानास्पद शेरेबाजी केली आहे . भास्करशेठ, रंग, रूप माणसाच्या हातात नसतं. माणसाचं रूप नाही तर कर्तृत्व बघावं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून बावनकुळे यांनी आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर राजकारणात महत्वाची पदे भूषवली आहेत.

 

मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांना भास्करावांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती. ज्या मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कररावांना अपमानित करून हाकलून दिले गेले त्याच उद्धवरावांची भास्कररावांना आरती करावी लागते आहे. या उद्धवरावांना आपले आमदार सांभाळता न आल्याने त्यांची हिट विकेट कशी गेली, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. रंग, रूपाचा माज करू नका.

ब्रिटनचा सध्याचा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे, हे लक्षात ठेवा. अमेरिकेलाही बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारावे लागले होते.
राजकारणात टीका जरूर करावी पण एखाद्याच्या रंग रुपावरुन टीका करून भास्कररावांनी आपली ब्रिटिश मानसिकता दाखवून दिली आहे.
वर्ण, जात विसरून विठ्ठलभक्तीची शिकवण महाराष्ट्राच्या भागवत धर्माने दिली आहे.

 

तुकाराम महाराज म्हणतात, ‘वर्णअभिमान विसरली याती, एकएकां लोटांगणीं जाती,
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें’ पाषाणा पाझर सुटती रे ‘भास्कररावांनी बावनकुळे यांच्या रंगावरून शेरेबाजी करून
भागवत धर्माचाच अपमान केला आहे’, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Politics News | shivsena uddhav thackeray leader bhaskar jadhav controversial statement on chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Dsk Vishwa Water Problem – MP Supriya Sule | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

MP Udayanraje Bhosale | ‘…तर मी आव्हानांना भीक घालत नाही’, उदयनराजेंचा अजित पवारांना टोला (व्हिडिओ)

RAJIV Gandhi e -Learning School Pune | राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलला ‘ISO 9001’ मानांकन