मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualified) सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) निर्णय देऊ शकते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांची धाकधुक (Maharashtra Politics News) वाढली आहे. ठाकरे गटासाठी (Thackeray Group) हा निकाल खूप महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून निकालावर बोलताना आमच्याच बाजूने निकाल लागेल असा दावा केल जात आहे. त्यातच मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेते शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
उदय सामंत म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) काही लोक, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसमधील (Congress) काही लोक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात आहेत, हे मी जबाबदारीने बोलत आहे, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. 172 पेक्षा जास्त म्हणजेच मेजॉरिटीचा (Maharashtra Politics News) विषयच नाही, असंही ते म्हणाले. सत्तासंघर्षाच्या बाबतीत यापूर्वीही अनेकदा आम्ही सांगितले आहे की, आमची योग्य बाजू न्यायालयात मांडली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल, असेही उदय सामंत म्हणाले.
आम्ही जे काही केलं आहे ते..
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) बोलताना देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय
पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करून टाकले.
सरकारही तयार करुन टाकले. मला असं वाटतं की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे.
शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही.
आम्ही जे काही केलं आहे ते सगंळं कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे,
असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Web Title :- Maharashtra Politics News | some people in the congress nationalists are in touch with shinde fadnavis and are saying this responsibly says uday samant
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update