Maharashtra Politics News | ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण (व्हिडिओ)

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाण्यात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) आमने-सामने आले आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण (beating) केल्याची घटना घडली आहे. फेसबुकवर पोस्ट केल्याच्या रागातून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला (Maharashtra Politics News) मारहाण करण्यात आली. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा (FIR) दाखल केलेला नाही. यावरुन ठाण्याचे खासदार राजन विचारेंनी (MP Rajan Vichare) शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

ही घटना सोमवारी (दि.3) रात्री 8.30 च्या सुमारास घडली. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Group) युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी दीपक शिंदे (Roshni Deepak Shinde) यांना माराहण करण्यात आली. रोशनी शिंदे काम करत असलेल्या कंपनीत घुसून शिंदे गटाच्या जवळपास 15 महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत रोशनी शिंदे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात (Kasarvadvali Police Station) लेखी तक्रार दिली आहे.

या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना खासदार राजन विचारे म्हणाले, महाराष्ट्राने गेले नऊ महिने चाललेला हा तमाशा आणि अत्याचार पाहिला असेल. प्रत्येक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात (Maharashtra Politics News) येत आहेत. एका युवती सेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला शोरुममध्ये जात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ती महिला पदाधिकारी गर्भवती असूनही तिला मारहाण करण्यात आली.

राजन विचारे पुढे म्हणाले, तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता केवळ अर्ज दाखल करुन घेतला. रुग्णालयात तपासणीसाठी गेलो, तर त्याठिकाणी दाद देण्यात आली नाही. सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांना छळण्यासाठी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचे विचार घेऊन पुढे चाललो, असं सागता. तर मग एखाद्या महिलेला चक्कर येईपर्यंत मारहाण करता, ही अमानुष घटना आहे. उद्या त्या मुलीला काही झाले, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल, असा इशारा राजन विचारे यांनी दिला आहे.

ठाकरे गटाचा पोलीस ठाण्यात ठिय्या

कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शोरुममध्ये घुसून काही महिलांनी हल्ला केला.
या घटनेनंतर खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी
कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र, या घटनेला 12 तास उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Maharashtra Politics News | uddhav thackeray group female leader allegedly beaten up by eknath shinde shivsena women officials
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Benefits of Millet | चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया !

Ajit Pawar | ‘अशोक चव्हाण भाजपत जाणार’, शिरसाट यांच्या दाव्यावरुन अजित पवारांचा टोला, म्हणाले-‘पिंजऱ्यातील पोपटाने…’

Pune ACB Trap | 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा