मोदी-ठाकरे, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यासह ‘या’ दिग्गजांच्या भेटीगाठींचा काय आहे अर्थ ? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात मागील काही काळापासून राजकीय maharashtra politics हालचालींना वेग आला आहे. एका पाठोपाठ एक होत असलेल्या मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठींवरून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यास maharashtra politics सुरूवात झाली आहे. नुकतीच सीएम उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी दिल्लीत पीएम नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांची भेट घेतली. ज्यानंतर शिवसेना खासदार राऊत Shiv Sena MP Raut यांनी पीएम मोदींचे जोरदार कौतूक केले. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार Sharad Pawar यांची भेट घेतली. या दरम्यान आता शुक्रवारी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी सुद्धा मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे.

मात्र, एनसीपी NCP खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी प्रशांत किशोर यांच्या सोबतची भेट राजकीय नसल्याचे म्हटले आहे. मात्र, एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक Nawab Malik यांनी मान्य केले आहे की, या भेटीत राजकीय चर्चा सुद्धा झाली आहे. अंदाज वर्तवला जात आहे की, 2024 च्या राष्ट्रीय रणनीतिची हालचाल सुरू झाली आहे.

असा अंदाज सुद्धा वर्तवला गेला आहे की, बंगाल निवडणुकीचा निकाल पाहून महाराष्ट्रात सुद्धा प्रशांत किशोर यांच्या सेवेचा वापर होऊ शकतो.
परंतु स्वता प्रशांत किशोर यांनी हे स्पष्ट केले आहे की, ते आता अशाप्रकारच्या सेवा देणार नाहीत.
काहीतरी वेगळे आणि मोठे करण्याचा विचार होऊ शकतो.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, शरद पवार यांनी एनसीपीच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त वक्तव्य केले होते की,
महाराष्ट्रातील सरकार 5 वर्ष चालेल आणि 2024 मध्ये सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढवू शकतात.
त्यांच्या या वक्तव्यानंतर दुसर्‍याच दिवशी ही भेट झाली आहे.

परंतु ही पहिली वेळ नाही की प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा केली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेसाठी प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क केला होता.
आणि त्यांच्याशी संबंधीत आयपॅकने आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्यासोबत प्रचारात काम सुद्धा केले होते.
मात्र काही मुळ मुद्द्यांवर शिवसेना आणि प्रशांत किशोर पूर्णपणे सोबत काम करू शकले नव्हते, ज्याप्रकारे त्यांनी टीएमसीसोबत TMC केले.

तर सुप्रिया सुळे सुद्धा प्रशांत किशोर यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांना सुद्धा वाटत होते की, किशोर यांनी एनसीपीसोबत कॅम्पेनचे काम करावे परंतु स्वता शरद पवार तेव्हा यासाठी तयार नव्हते.
पारंपरिक राजकारणावर विश्वास असणारे पवार हे प्रोफेशनल राजकीय रणनीतिकाराच्या मदतीने निवडणूक लढण्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत.
परंतु आता स्थिती बदलली आहे.
बहुचर्चित बंगाल निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा करिश्मा आणि देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक नेत्यांसोबत त्यांचे नाते 2024 च्या दृष्टीने त्यांचे महत्व वढवते.
कदाचित हीच गोष्ट शरद पवार यांनी हेरली असावी.

मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाल वाढवणार्‍या आणखी अनेक बैठका झाल्या आहेत. त्यांच्यावर सुद्धा एक दृष्टीक्षेप टाकुयात…

शरद पवार-अमित शाह यांची अहमदाबादमध्ये कथित भेट
या बैठकीला कथितच म्हटले जाईल कारण दोन्ही नेते एकाच वेळी शहरात दिसून आले होते, परंतु राष्ट्रवादीने दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे वृत्त फेटाळले होते तर अमित शाह यांनी सुद्धा यावर संभ्रम कायम ठेवला. मात्र, चर्चा ही होती की, उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव कायम ठेवण्यासाठी पवार आणि शाह यांची कथित बैठक झाली असावी. या बैठकीनंतर आरोग्याच्या कारणामुळे सुमारे 2 महिने शरद पवार राजकीय हालचालींपासून दूर होते.

देवेंद्र फडणवीस-शरद पवार यांची मुंबईत भेट
शरद पवार हॉस्पिटलमधून घरी परतताच, देवेंद्र फडणवीस त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले.
मात्र, ही माहिती स्वता फडणवीस यांनी ट्विट करून दिली आणि म्हटले की, ते केवळ विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटले होते.
मात्र, पवार आणि फडणवीस एकमेकांचे कट्टर विरोधक राहिले आहेत.
जरी पवार यांचे पीएम मोदी यांच्यासह अनेक इतर नेत्यांशी चांगले संबंध असले तरी.

फडणवीस यांनी 2019 मध्ये असेही म्हटले होते की, महाराष्ट्रात शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहे. असे म्हटले जाते की, त्यावेळी एनसीपी-भाजपा एकत्र येऊ शकले नाहीत. याचे एक कारण असे सुद्धा मानले जात आहे की, पवार यांनी फडणवीस यांना हटवण्याची अट ठेवली होती. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर फडणवीस असे भाजपा नेते आहेत, ज्यांनी थेट पवार यांना निशाणा बनवले होते. यामुळे फडणवीस यांचे पवारांच्या घरी जाणे हे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

पवार- उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट
फडणवीस आणि पवारांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख पवार हे सीएम उद्धव ठाकरे यांना भेटले होते.
वृत्त आले होते की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती.
मात्र दोन्ही पक्षांनी याचे खंडन केले. परंतु यामुळे एनसीपी आणि शिवसेनेच्या संबंधात आणि सरकारमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या पसरल्या.
आणि या संपूर्ण प्रकरणाकडे फडणवीस-पवार आणि पवार-अमित शाह यांच्या ‘कथित’ बैठकीशी जोडून पाहण्यात आले.

या दरम्यान महाराष्ट्र महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार पडण्याच्या नवीन तारखांची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवसेना आणि भाजपाच्या बिघडलेल्या नात्यादरम्यान एनीसीपी-भाजपाचे ‘वार्म अप’ दिसून आले.

सीएम उद्धव ठाकरे- पीएम मोदी यांची दिल्लीत भेट
दरम्यान, सीएम उद्धव ठाकरे यांची 7 जून रोजी पीएम मोदी यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली.
या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
परंतु या बैठकीपेक्षा सुद्धा जास्त चर्चा उद्धव ठाकरे आणि मोदी या दोघांमध्येच झालेल्या 40 मिनिटांच्या बैठकीची होती.
उद्धव ठाकरे यांनी यातून दर्शवले की, त्यांचे सुद्धा वैयक्तिक संबंध अजूनही पीएम मोदी यांच्याशी चांगले आहेत आणि ‘वार्म अप’चा खेळ ते सुद्धा करू शकतात.

तिकडे, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि मोदींमध्ये एकट्याने झालेल्या भेटीबाबत सुरू असलेल्या शंकाकुशंका फेटाळत म्हटले की, अशाप्रकारच्या भेटींवरून अंदाज वर्तवणे की,
महाराष्ट्र सरकारला धोका आहे, ही चुकीची कल्पना आहे.

राजकारणात लोक एकमेकांना भेटत असतात, परंतु ज्याप्रकारचे maharashtra politics राजकारण महाराष्ट्रात 2019 maharashtra politics मध्ये दिसून आले, त्यानंतर अशाप्रकारच्या प्रत्येक भेटीचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात.

Hinjewadi Shivajinagar Metro Route | हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोसाठी महापालिकेला प्रसंगी ‘रोख’ मोबदला देउन भूसंपादन करावे लागणार; प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे