Maharashtra Politics | ‘धमाका 5 महिन्यापूर्वी झाला, आता नव्या वर्षातही…’, शिंदे गटाच्या मंत्र्याचा मोठा दावा

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आले आहे. ते 2019 मध्ये यायला हवे होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच शिंदे गटातील (Shinde Group) एका मंत्र्यांने गौप्यस्फोट (Maharashtra Politics) करत नवीन वर्षात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे गटातील नेते, मंत्री उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे.

 

मागील काही दिवसांपासून सरकार पडण्याचे दावे केले जात होते. मात्र त्यामध्ये काही तथ्य नव्हते. तेव्हा 170 हा आमचा मेजॉरिटी आकडा (Maharashtra Politics) होता. परंतु आता आगामी काळीत 10 ते 12 आमदार (MLA) आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याही संपर्कात काही आमदार आहेत. त्यामुळे सरकारच्या संख्याबळाचा आकडा 180 ते 182 होऊ शकतो. धमका पाच महिन्यापूर्वीच झाला, त्याचे पडसाद नव्या वर्षात आणखी दिसू शकतात, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महामोर्चाबाबत बोलताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले,
महामोर्चात कितीही लोक आले तरी सरकार त्याला घाबरत नाही.
कायदा सुव्यवस्था (Law and Order) कोणीही हातात घेऊ नये इतकी दक्षता ठेवावी.
शेवटी मोर्चा काढण्याचे काही नियम आणि धोरण आहे. त्यांनी त्याचे पालन करुन मोर्चा काढावा असा सल्ला सत्तार यांनी दिला.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं स्पष्ट सांगितलं आहे की, आम्ही कोणालाही अडवलेलं नाही, असंही सत्तार सांगायला विसरले नाहीत.

 

Web Title :- Maharashtra Politics | shinde group minister uday samant claims that 10 to 12 mla likely to join shinde group in new year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट