Maharashtra Politics | निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | शिवसेना पक्षाचं नाव (Shivsena Party Name) आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निवडणूक आयोगानं (Election Commission) दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) हेही एकनाथ शिंदे (Maharashtra Politics) यांना देण्यात आले आहे.

 

2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळविण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) पक्षाच्या घनटेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवले नाहीत.

 

शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेल बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षक निवडणूक आयोगानं नोंदवलं आहे. पक्षांतर्गत निवडणूक न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.

निवडणूक आयोगाने 78 पानांचा निकाल दिला आहे. या निकालात शिवसेनेचा इतिहासच बदलला गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) आयोगाला मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र दिली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार (MLA) आणि खासदार (MP) कुणाकडे हाच कळीचा मुद्दा ठरला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 55 पैकी 40 आमदार तर 13 खासदार गेले, याशिवाय प्रतिनिधींसभेतही बहुमत आपल्या बाजूने आहे, असा दावा शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाककडे करण्यात आला होता. (Maharashtra Politics)

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती.
शुक्रवारी निवडणूक आयोगानं यासंदर्भात निर्णय दिला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील शिंदे यांना मिळाले आहे. त्यामुळे यापुढील काळात एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असणार आहे. ठाकरे कुटुंबियांकडून शिवसेना निसटली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी शिंदेगटाकडून महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) आणि
हरीश साळवे (Harish Salve) यांनी आम्ही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं नाही, तर ही पक्षांतर्गत लोकशाही आहे.
आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे, असा दावा केला.
आता निवडणूक आयोगानेच शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे
यांना दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळीही एकनाथ शिंदेंकडून हा दाखला दिला जाऊ शकतो.
निवडणूक आयोगाने आम्हाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे, त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होऊ शकतो,
असा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणाला मोठं वळण मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | shivsena crisis biggest setback to uddhav thackeray eknath shinde got bow arrow symbol from election commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा