Maharashtra Politics | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग करून संजय राऊतांनी केलं ट्विट, म्हणाले – ‘…अब सभी को सभी से खतरा है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना आणि शिंदे गट, भाजपामधील राजकीय वादामुळे राज्यात अस्तित्वात आलेले नवीन सरकारही अधांतरी असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेच्या हालचाली सुद्धा मंदावल्या आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयावरच शिवसेना आणि शिंदे – फडणवीस सरकारचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, …अब सभी को सभी से खतरा है. (Maharashtra Politics)

 

संजय राऊत यांनी हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांचे कार्यालय आणि प्रियंका गांधी या नेत्यांना टॅग केले आहे. यानंतर पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, हे भविष्यात कळेलच की कुणाला कुणापासून धोका आहे. आम्हाला कुणापासूनही धोका नाही. जे व्हायचे होते, ते होऊन गेले. पण भविष्यात कुणीही राजकारणात स्वत:ला सुरक्षित समजू नये. सगळ्यांच्याच हातात खंजीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका आहे. (Maharashtra Politics)

नव्या सरकारविरोधात आणि बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने केवळ विधानसभा अध्यक्षांना बंडखोर आमदारांविरोधात याचिकांवर सुनावणी होऊन निकाल येईपर्यंत तूर्त कारवाई करू नये, असे निर्देश दिले.
तसेच या प्रकरणाची सुनावणी स्वतंत्र खंडपीठासमोर होणार असल्याचे सांगितले.

 

एकीकडे मंत्रिमंडळ स्थापनेसाठी पूर्ण तयारीत असलेले शिंदे-फडणवीस सरकार आणि दुसरीकडे आपला पक्ष वाचवण्यासाठी धडपड करणारी शिवसेना सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या सुनावणीची वाट पहात होते.
परंतु ही सुनावणी लांबणीवर गेल्याने आता सर्वांचीच अडचण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी लांबणीवर टाकल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
उशीरा दिलेला निकाल म्हणजे प्रत्यक्ष न्याय देण्यासच विलंब, असे म्हटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | shivsena mp sanjay raut tweet on maharashtra politics eknath shinde devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा