×
HomeशहरऔरंगाबादMaharashtra Politics | तब्बल दोन दशकानंतर 'या' नेत्याचे शिवसेनेत पुनरागमन; उद्धव ठाकरे...

Maharashtra Politics | तब्बल दोन दशकानंतर ‘या’ नेत्याचे शिवसेनेत पुनरागमन; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | शिवसेना पक्ष सोडून तब्बल दोन दशकं उलटल्यानंतर पुनश्च एकदा माजी महापौर सुदाम सोनवणे (Sudam Sonavane) यांनी शिवबंधन बांधले आहे. ‘मातोश्री’ वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सुदाम सोनवणे यांनी शिवबंधन बांधले. भूखंड प्रकरणात त्यांचे मातोश्री कडून दिल्या गेलेल्या आदेशात शिवसेना पक्षातून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर परत एकदा दोन दशकानंतर सुदाम सोनवने यांनी शिवसेना पक्षप्रवेश केला. त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics)

 

राजकारणात काहीही घडू शकते. कोण कधी कुठल्या पक्षातून बाहेर पडून कुठल्या पक्षात जाईल. हे सांगता येत नाही. तीन वेळेस शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर महापौरपद भूषवलं. अशी काराकीर्द असलेल्या सुदाम सोनवणे यांनी दोन दशकांपूर्वी शिवसेनेला रामराम केला. त्यानंतर अनेक पक्षांचे झेंडे हाती घेत त्यांनी राजकीय पटलावर राजकारण केले. एका भूखंड प्रकरणातील घोटाळ्यात त्यांच्यावर मातोश्रीकडून कारवाई करण्यात आली होती.

शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अनेकदा शिवसेनेवर टीका केली. त्यातच आता परत एकदा त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी सुदाम सोनवणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai), माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी (Kishanchand Tanvani), विश्वनाथ स्वामी हे ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. (Maharashtra Politics)

 

दरम्यान, सोनवने यांना पक्षात प्रवेश दिल्याने गेली २० वर्षे ज्यांनी सोनवणे यांच्या विरोधात शिवसेनेचा गड असलेल्या सिडको भागात काम केले.
अशा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे समजत आहे.
पण, शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून विश्वासातील आणि जुन्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली जात असल्याचे समोर आले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | sudam sonawane joins shivsena uddhav balasaheb thackeray again after two decades

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Chinchwad Bypoll Election | चिंचवडचा पुढील आमदार कोण? लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं मोठे वक्तव्य

Must Read
Related News