Maharashtra Politics | शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने ‘50 खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला तर शिवसैनिक…, युवासेनेचा इशारा

मुंबई : Maharashtra Politics | जर निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिले, तर ठाकरेंचा शिवसैनिक (Shiv Sainik) रस्त्यावर उतरेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, असा गंभीर इशारा युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी दिला आहे. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी, निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देईल, असा गौप्यस्फोट केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यानंतर शरद कोळी यांनी संताप व्यक्त केला. (Maharashtra Politics)

शिंदे गटाच्या 16 आमदारांचे निलंबन आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाच्या (Dhanushyaban Symbol) वादावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच सदस्यीय घटनापीठाने शिवसेनेला (Shisena) धक्का देत शिंदे गटाला मोठा दिलासा दिला होता. निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत पुढील कार्यवाही करण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. आता धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे की शिंदे गटाचे यावरील निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद कोळी यांनी वरील इशारा दिला आहे.

शरद कोळी म्हणाले, अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा , गुडघ्याला बाशिंग. शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर सोपवली आहे. निवडणूक आयोगाने जर पक्षपात करत निर्णय दिला किंवा शिंदे गट आणि निवडणूक आयोग यांनी जर ‘50 खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आहे. (Maharashtra Politics)

यूवासेनेने आक्रमक भूमिका घेतली असून काही दिवसांपूर्वीच शरद कोळी यांनी मंत्री तानाजी सावंत
(Tanaji Sawant) यांच्यावर सुद्धा जोरदार निशाणा साधला होता.
कोळी यांनी तानाजी सावंत यांना उद्देशून म्हटले होते की, उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगणार्‍यांना ठेचून काढू.
शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी तोंड सांभाळून बोलावे.

कोळी यांनी तानाजी सावंत यांना इशारा देताना म्हटले होते की, सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते.
पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) कधीही दिल्लीसमोर झुकले नाहीत.
शिवाजी महाराजांना मुघलांकडून अनेकदा बोलावणे आले होते.
पण शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेसाठी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत.
उद्धव ठाकरे देखील झुकणार नाही.

Web Title :- Maharashtra Politics | yuva sena sharad koli slams eknath shinde group and election commission over shivsena party symbol clashes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची दौंड तालुक्यात मोठी कारवाई, भेसळयुक्त गूळाचा साठा जप्त

Shivajirao Adhalarao Patil | ‘मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं’, आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Chandrasekhar Bawankule | ‘अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात