Maharashtra Prison Department | मुंबई विभागातील न्यायधीन बंद्यांसाठी राज्य कारागृह विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Prison Department | महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या दक्षिण (मुंबई) विभाग अंतर्गत कारागृहातील न्यायाधीन बंद्यांना न्यायालयाकडून शिक्षा सुनावल्या नंतर वर्गवारी नियमानुसार राज्यातील इतर कारागृहांकडे वर्ग करणेबाबत कारागृह मुख्यालयाच्या परिपत्रकानुसार कार्यवाही केली जात होती. या बंद्यांना नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, तलोजा, येरवडा, सिंधुदुर्ग येथे वर्ग करण्यात येत होते. मात्र, आता मुंबईतील कैद्यांना नागपूर व अमरावती येथे वर्ग न करण्याचा निर्णय घेण्यात (Maharashtra Prison Department) आला आहे.

 

जे शिक्षाधीन बंदी मुंबई येथून नागपूर, अमरावती येथे वर्ग केले जात होते. यामुळे बंद्याच्या नातेवाईकांना 700 ते 800 किलोमीटरचा प्रवास करून बंद्यासोबत मुलाखत घेण्यासाठी जावे लागत होते. यासाठी बंद्याच्या नातेवाईकांना दूरचा प्रवास करावा लागत होता, आर्थिक खर्च, वेळ वाया जात होता. या सर्व बाबींचा विचार करुन महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाने (Maharashtra Prison Department) मुंबईतील न्याधीन बंद्यांना नागपूर, अमरावती येथे वर्ग न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कारागृहातील बंदी व त्याचे कारागृह बाहेरील नातेवाईक यांच्यातील संवाद सुलभ व्हावा, त्यांना नियमानुसार असणाऱ्या मुलाखती घेणे सुलभ व्हावे,
त्यांच्या मधील नैराश्य कमी व्हावे इत्यादी बाबींसाठी मुंबई विभागातील कारागृहातील (Mumbai Division Jail) शिक्षा लागलेल्या शिक्षाधीन बंद्याना नागपूर व अमरावती कारागृहात वर्ग न करता
कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक कारागृहात वर्ग करण्यात येणार आहे.
याबाबतचे मुंबई विभागातील कारागृह अधीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे कारागृहातील बंदी व त्यांचे नातेवाईक यांचे मध्ये निश्चितच समाधानाचे वातावरण आहे.

 

Web Title :- Maharashtra Prison Department | A major decision by the State Prisons Department for under-trial prisoners in Mumbai Division

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या आमदाराचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘शपथविधीबाबत संजय राऊतांना…’

Chetan Sharma Resigns | BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मांचा राजीनामा

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना