Maharashtra Pune ATS | राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून आणखी एकाला अटक, आतापर्यंत 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Pune ATS | पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड (Pune Crime News) परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी Mohammad Yunus Mohammad Yakub Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले आहे. आरोपींना पुण्यात आल्यानंतर आश्रय देणाऱ्या व्यावसायिकाला पैसे पाठविणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझीला (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पंढरी रत्नागिरी) (Mechanical Engineer) दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra Pune ATS) शनिवारी अटक केली. तर मंगळवारी (दि.1) झुल्फिकार अली बरोडावाला (Zulfikar Ali Barodawala) याला अटक केली असून अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाली आहे.

सिमाब नसरुद्दीन काझीने अब्दुल कादीर दस्तगीर पठाण Abdul Qadir Dastgir Pathan (वय 32, रा, कोंढवा) याला पैसे पाठवले. ते पैसे पठाणने पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना टेरर फंडिंगसाठी (Terror Funding) दिल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या प्रकरणाचा तपास सध्या महाराष्ट्र एटीएस (Maharashtra Pune ATS) करत आहे. महाराष्ट्र एटीएसने मंगळवारी (दि.1) झुल्फिकार अली बरोडावाला याला अटक केली आहे.
NIA मुंबई (NIA Mumbai) कडील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody)
असलेल्या झुल्फिकारचा एटीएस कडे असलेल्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे एटीएसने न्यायालयाकडून प्रोडक्शन वारंट (Production Warrant) वरुन आरोपीला मुंबई मध्यवर्ती कारागृहातून (Mumbai Central Jail) वर्ग करुन घेऊन दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. त्याची पोलीस कोठडी घेऊन एटीएस तपास करत आहे.

एटीएसने अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे.  
तर पुण्यातून फरार झालेल्या मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam
 (वय 31)  या आरोपीचा शोध एटीएसच्या पथकाकडून केला जात आहे.
तसेच फरार झालेल्या आरोपीला आणि गुन्ह्यातील आरोपींना फरार कालावधीमध्ये
मदत करणाऱ्यांचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | डोळ्यासमोर पती आणि 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू,
पाबळ-शिरुर रोडवर ट्रक दुचाकीचा भीषण अपघात

Fatima Sana Shaikh | फातिमा शेख हिचा आमिर खान नाही तर ‘हा’ आहे आवडता अभिनेता