
Maharashtra Pune ISIS Module Case | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात NIA चा मोठा निर्णय, चार वॉन्टेड गुन्हेगारांवर ठवले लोखोंचे बक्षिस
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Pune ISIS Module Case | काही महिन्यापूर्वी शहरातील कोथरुड भागातून पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. पुण्यात दहशतवादी सापडल्याने खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांचा ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची (ISIS Terrorist Organization) उपसंघटना ‘सुफा’ या संघटनेशी (Sufa Organization) संबंधित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेने इतर चार आरोपींवर लाखो रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. (Maharashtra Pune ISIS Module Case)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे इसीस मोड्युल प्रकरणातील चार वाँटेड आरोपींवर एनआयए कडून प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. मोहम्मद शहनवाज, शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि ताला लिवाकत खान अशी या आरोपींची नावे आहेत. (Maharashtra Pune ISIS Module Case)
एनआयए कडून या चार जणांवर बक्षीस ठेवण्यात आले असून दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्या प्रकरणी या आरोपींचा वॉन्टेड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षिस दिले जाणार असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही एनआयएकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान एनआयए कडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
आतापर्यंत केलेल्या तपासात एनआयएने सात आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी बॉम्ब बनवण्याची कार्यशाळा घेत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ
गणपती वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण करुन तोडफोड; लोणी स्टेशन येथील चौघांवर गुन्हा दाखल (Video)
कल्याणीनगर : सिक्रेट पोलीस असल्याचे सांगत चोरट्याने मोबाईल घेऊन ठोकली धुम
वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याची करोडोची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून एकाला अटक