Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे (Mumbai To Goa National Highway) . या रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम मे २०२३ अखेर, तर दुसऱ्या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होईल. हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Maharashtra PWD Minister Ravindra Chavan) यांनी विधानपरिषदेत (Vidhanparishad) प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री चव्हाण बोलत होते.

मंत्री चव्हाण म्हणाले की, मागील दहा वर्ष हे काम सुरू आहे. यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीत असलेल्या अडचणी
दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. पनवेल ते इंदापूर रस्त्याचे
(Panvel To Indapur Road) काम पूर्ण होण्यासाठी पनवेल ते कासू रस्त्यासाठी १५१ कोटी रुपये, तर कासू ते इंदापूर (Kasu to Indapur) रस्त्यासाठी ३३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामासाठी दोन वेगवेगळ्या संस्था नियुक्त केल्या असून त्यांच्यामार्फत काम सुरू आहे. या रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी ड्रोन बसविण्यात आले आहेत. रोजच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.

या प्रश्नांच्या अनुषंगाने सदस्य जयंत पाटील (Jayant Patil), भाई जगताप (Bhai Jagtap),
महादेव जानकर (Mahadev Jankar), निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) , अनिकेत तटकरे
(Aniket Tatkare) यांनी उप प्रश्न उपस्थित केले.

Web Title :  Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | Mumbai to Goa National Highway work in progress – Public Works Minister Ravindra Chavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार