पोलीसनामा ऑनलाईन : Maharashtra Rain Update | राज्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता तसेच किमान तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी सायंकाळनंतर नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Maharashtra Rain Update)
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
राज्यात औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, पुणे या जिल्ह्यात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्यामुळे त्याचा रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भुसावळ तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पसरले आहे. या बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा यासह केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. (Maharashtra Rain Update)
काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडी जाणवत असून या बदलत्या वातावरणामुळे
रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक या बदलत्या वातावरणामुळे जाणार या भीतीने राज्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.
Web Title :- Maharashtra Rain Update | marathwada will rain in madhya maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrapur Accident | चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात; 2 ठार, 17 जखमी
Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन