Maharashtra Rain Update | राज्यभर 12 ते 14 जुलैदरम्यान हलक्या सरींची शक्यता; IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | महाराष्ट्रातील अनेक भागात 12 ते 14 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पाऊस (Maharashtra Rain Update) पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात पावसाची तीव्रता कमी असेल, असे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी सांगितले. या आठवड्यात कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई (Mumbai) पुण्यात (Pune) पावसाची रिपरिप कमी झाली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मात्र दिवसभर पावसाची (Maharashtra Rain Update) रिपरिप सुरू होती. जुलैमध्ये (July) मात्र पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. मुंबई आणि उपनगरात आभाळ भरून येते. मात्र, पाऊस पडत नाही. रविवारी उपनगरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसभर पावसाची (Rain) संततधार सुरू होती. भिवंडी, डोंबिवली, कल्याण, बदलापूर परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. ठाणे शहरात मात्र पावसाने हुलकावणी दिली. खोपट येथील आंबेडकर रोड परिसरात झाडाची फांदी तुटली. भिवंडीत पावसामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसाची नोंद झाली.

उत्तर भारतात संततधार –

अनेक राज्यांमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) जोर धरला आहे.
संततधार पावसामुळे देशातील विविध भागांत आतापर्यंत जवळपास 20 जणांना जीव गमवावा लागला आहे.
पावसाचा अंदाज घेता येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला. जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत झालेल्या पावसाने देशभरात पावसाची कमतरता भरून काढली, असे हवामान खात्याने सांगितले. आतापर्यंत एकूण 243.2 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक आहे.

Web Title :  Maharashtra Rain Update | no rain in mumbai suburbs thane rain continues throughout the day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीच्या भावानेच फसवलं ! सॉफ्टवेअर इंजिनिअरची 28 लाखाची घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

Maharashtra Cabinet Expansion | भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; मंत्रिमंडळातील चौघांना मिळणार डच्चू?, ‘या’ भागातील मंत्र्यांचा समावेश

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Weekly Horoscope (10-16 July) : हा आठवडा सर्वांसाठी कसा असेल, वाचा १२ राशींचे साप्ताहिक राशिफळ

Depression | ‘या’ बियांच्या सेवनाने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’, जाणून घ्या त्याचे फायदे