Maharashtra Rains | शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शनिवारपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) मंगळवारी व्यक्त केला. त्यानुसार राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांत पुढील चार दिवस जोरधारा कोसळणार असून त्यापैकी नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार, तर नऊ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Rains)

 

पालघर जिल्ह्यात १४ ते १६ सप्टेंबर, ठाणे, मुंबईत १५ सप्टेंबर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांत १४ सप्टेंबर, तर पुणे जिल्ह्यात १४ आणि १५ सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा नारंगी इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेला आठवडाभर राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. काही भागातील पाऊस मंगळवार पासून ओसरला असला, तरी शनिवारपर्यंत काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातून पाऊस ओसरण्यास सुरूवात झाली आहे. (Maharashtra Rains)

 

दरम्यान, ठाणे आणि मुंबईत (१४ ते १६ सप्टेंबर, रायगड जिल्ह्यात १६ आणि १७ सप्टेंबर, रत्नागिरी १५ ते १७ सप्टेंबर,
सिंधुदुर्ग १४ ते १६ सप्टेंबर, नंदूरबार आणि नाशकात १५ सप्टेंबर, कोल्हापूर १५ आणि १६ सप्टेंबर,
तर साताऱ्यात १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | Rain across the state till Saturday; Overwhelming in nine districts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI SO Recruitment 2022 | स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरची भरती, ताबडतोब करा अप्लाय

 

Uday Samant | ‘प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख, पण…’, उद्योगमंत्री उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

 

Diet Tips For Uric Acid | सर्वात बेस्ट आहे ‘या’ पीठाची भाकरी, ताबडतोब कमी होईल यूरिक अ‍ॅसिड, सांधेदुखीसुद्धा होईल दूर