Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस या भागात ‘धो-धो’ पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – Maharashtra Rains | पुण्यासह (Pune) परिसरात सोमवारी रात्री तुफान पाऊस बरसला. सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. शेतीचेही नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने (IMD) राज्यात (Maharashtra Rains) पुढील चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आधीच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे त्यात पुन्हा पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

५ ऑक्टोबर
दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

६ ऑक्टोबर
दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटाची शक्यता. विर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rains)

७ ऑक्टोबर
कोकण, मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

८ ऑक्टोबर

कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज
पुणे परिसरात ५ व ६ ऑक्टोबरला आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहील.
मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता). तर ७ व ८ ऑक्टोबरला आकाश अंशत: ढगाळ राहील दुपारी आणि संध्याकाळी मात्र आकाश सामान्यत: ढगाळ राहील व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.)

Web Title :- maharashtra rains | weather forecast of maharashtra heavy rainfall in pune now imd alert rain in some parts of maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp आणतंय Voice मेसेजसाठी अतिशय विशेष फीचर, यूजर्सला मिळेल नवीन ‘ऑपशन’; जाणून घ्या

SBI PO Recruitment 2021 | SBI मध्ये 2056 जागांसाठी बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 2000 ऐवजी 4000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही ‘लाभ’