COVID-19 : राज्यात ‘कोरोना’चं संकट कायमच ! 24 तासात 6555 नवे पॉझिटिव्ह तर 151 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 206619 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात आजही उच्चांकी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 6 ते 7 हजार रुग्ण नव्याने आढळत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 6555 रुग्ण आढळून आले आहेत. तर 151 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 06 हजार 699 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 8822 वर गेला आहे. मुंबईत एकूण रुग्ण संख्या 84524 वर पोहचली आहे.

आज राज्यात 3685 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्य़ंत 111740 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात बरे होण्याचे प्रमाण 54.08 टक्के इतके झाले आहे. राज्याचा मृत्यू दर 4.27 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 86040 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज ठेणे महापालिका क्षेत्रात 373 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीत बाधितांची संख्या 10731 इतकी झाली आहे.

राज्यात सध्या 604463 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 46062 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांन दिली आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबई मनपाच्या हद्दीत झाले आहेत. मुंबई मनपा हद्दीत 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.