Maharashtra Sadan | रूपिंदर सिंग महाराष्ट्र सदनचे नवे निवासी आयुक्त

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनचे (Maharashtra Sadan) निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव म्हणून रूपिंदर सिंग (IAS Rupinder Singh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन (IAS Neeva Jain) यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. (Maharashtra Sadan)

रूपिंदर सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६ च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते केंद्र शासनाच्या युनीक आयडेंटिफिकिशेन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) येथे उपमहासंचालक पदावर सात वर्ष कार्यरत होते. (Maharashtra Sadan)

युनीक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया एक वैधानिक प्राधिकरण असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत संस्था आहे. ही वैधानिक संस्था केंद्र सरकारद्वारे आधार कायदा 2016 च्या तरतुदींनुसार स्थापन करण्यात आली आहे.

रूपिंदरसिंग यांनी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक प्रभारी अमरज्योतकौर अरोरा यांनी रूपिंदरसिंग यांची सदिच्छा भेट घेतली
व त्यांना माहे जुलै 2023 चे लोकराज्य अंकाची प्रत भेट केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

Pushpa 2: The Rule | ‘पुष्पा 2’ चित्रपटातील व्हिलन फहाद फासिलचा लूक आऊट

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने केले दुसऱ्यांदा लग्न; लिपलॉक करताना व्हिडिओ व्हायरल

Rati Pandey | “मी पूर्ण दिवस एका बिस्किटावर काढायचे…”; अभिनेत्री रति पांडेनी सांगितला स्ट्रगल पीरियडमधील अनुभव