Maharashtra Sadan Scam | भुजबळ अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील ३ आरोपी ‘माफी’चे साक्षीदार होणार, सुनावणीस कोर्ट तयार!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Sadan Scam | याचिका हरवली, असे ईडीने सांगितल्याने दिलासा मिळालेले ओबीसी नेते आणि महायुतीमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा अडचणीत आले आहेत. कारण महाराष्ट्र सदन घोटाळ्यात (Maharashtra Sadan Scam) जेलमध्ये असलेल्या तीन आरोपींनी या प्रकरणात आम्ही माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचा अर्ज दाखल केल्याने आणि कोर्टाने देखील यावर सुनावणी घेण्यास मान्यता दिल्याने छगन भुजबळ अडचणीत आले आहेत.

यापूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांना लाखो रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी दोन वर्षांची तुरुंगवारी झाली होती. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामासंबंधित ८५० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात व अन्य काही प्रकरणांत ईडीने छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि अन्य ५१ जणांवर २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. (Maharashtra Sadan Scam)

याप्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन
आरोपी आजही अटकेत आहेत. या तिघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता.
हा अर्ज मुंबई सेशन्स कोर्टातील विशेष
कोर्टाने स्वीकारला असून सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा अडचणीत आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Neelam Gorhe | सुषमा अंधारेंनी आठ दिवसांत दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्ताव, नीलम गोऱ्हेंचा इशारा

Lok Sabha Elections 2024 | पुण्यातील भाजपा आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले, दुसरीकडे वाटेकरी वाढले, धडधड वाढली