10 वी फेरपरीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 17 जुलै ते 30 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. दहावी फेरपरिक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.३०) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच याच संकेतस्थळावरून निकालाची प्रत काढता येणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या दरम्यान संबंधीत विभागीय मंडळात अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत किंवा गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी, गुणसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार जुलै 2019 च्या दहावीच्या परीक्षेत सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीनुसार दोन संधी मिळणार आहेत.

मार्च 2020 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत बसू इच्छिणाऱे पुर्नपरिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी व अन्य विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like