Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,169 नवीन रुग्ण, 29,270 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त Coronavirus रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 29 हजार 270 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.54 टक्के एवढे झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना Coronavirus रुग्णवाढीला ब्रेक लावण्यात यश आले आहे. आज राज्यातील रुग्णसंख्याही 15 हजारांवर आली आहे. राज्यात गेल्या तासांत राज्यात 15 हजार 169 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 29 हजार 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 54 लाख 60 हजार 589 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 57 लाख 76 हजार 184 इतके झाले असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.51 टक्के इतके आहे.

‘या’ देशात मिळतंय फक्त 1. 46 रुपये प्रति लिटर पेट्रोल, जाणून घ्या कारण

आज राज्यात 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 96 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.67 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 2 लाख 16 हजार 016 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 55 लाख 14 हजार 594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57 लाख 76 हजार 184 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16 लाख 87 हजार 643 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 7 हजार 418 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !