Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,229 नवीन रुग्ण, 25,617 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तसेच राज्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांना यश येताना पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 15 हजार 229 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 25 हजार 617 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Pune : पुण्यातील बड्या व्यावसायिकाला हवा होता पैशांचा पाऊस; पठ्ठ्यानं तब्बल 52 लाख मोजले पण…

राज्यातील कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 57 लाख 91 हजार 413 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत 54 लाख 91 हजार 413 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण बरे होत असताना मृत्यूचे प्रमाण कमी जास्त होत आहे. गेल्या 24 तासात 307 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 97 हजार 394 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 4 हजार 974 एवढी आहे.

पुण्यात कोरोनाचे 515 रुग्ण डिस्चार्ज
– दिवसभरात ४५० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ५१५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधित ३९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२.
– ७४२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 471228.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 5213.
– एकूण मृत्यू – 8340.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 457675.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8166.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे 894 रुग्ण डिस्चार्ज
– दिवसभरात 421 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 894 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधित 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. 24 तासात 7 जणांचा मृत्यू
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 251478.
– पिंपरी चिंचवडमधील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 4680.
– एकूण मृत्यू 4118.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 242680.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी 6377.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे