Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 7,720 ‘कोरोना’मुक्त, 5,609 नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात कोरोना (Coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (मंगळवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या मात्र आज वाढली आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत असताना दुसरीकडे मृत्यूंचा (Death) आकडा वाढताना दिसत असल्याने राज्यासाठी ही चिंताजनक स्थिती आहे.

राज्यात आज 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7,720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 हजार 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.8 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 137 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.1 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 66 हजार 123 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 1 लाख 34 हजार 201 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 99 लाख 05 हजार 096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 63 हजार 442 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 4 लाख 13 हजार 437 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 2,860 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title :- Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punjab Corona | पंजाबमध्ये कोरोनाचा उद्रेक; शाळा सुरू होताच 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

Pune Police | पुणे पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी