Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 51700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. राज्यात आज नव्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच कालच्या तुलनेत रुग्णसंख्येमध्ये आज मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 51 हजार 751 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 हजार 312 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आज (सोमवार) नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात कालच्या तुलनेत मोठी घट झाली असली तरी राज्याची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. राज्यात गेल्या 24 तासात राज्यात 51 हजार 751 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 258 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर काल राज्यात 63 हजार 294 रुग्ण आढळून आले होते आणि 349 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज 11 हजार 543 ने घट झाली आहे.

आज राज्यात 52 हजार 312 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 28 लाख 34 हजार 473 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.94 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 258 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 58 हजार 746 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.68 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 5 लाख 64 हजार 746 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 10 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 23 लाख 22 हजार 393 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34 लाख 58 हजार 996 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.49 टक्के आहे. सध्या राज्यात 32 लाख 75 हजार 224 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 हजार 399 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.